Anjali Damania : एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? भाजपचं षडयंत्र… अंजली दमानिया नेमंक काय म्हणाल्या?
विरोधी पक्ष संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपला आपलाच माणूस बसवून विरोधी पक्ष नष्ट करायचा आहे. तर एकनाथ शिंदेंनी असे प्रयोग करू नये, लोकशाही जिवंत ठेवावी, असा हल्लाबोलही अंजली दमानिया यांनी केलाय.
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? असं अंजली दमानिया यांनी म्हणत एक ट्विट केले आहे. सध्या हेच ट्विट चांगलंच चर्चेत आहेत. इतकंच नाहीतर विरोधी पक्ष नेता संपवण्याचा हा भाजपचाच कट असल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे. गावी जाणे, ताप येणे पुन्हा घरी येणे ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचे म्हणत अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपला आपलाच माणूस बसवून विरोधी पक्ष नष्ट करायचा आहे. तर एकनाथ शिंदेंनी असे प्रयोग करू नये, लोकशाही जिवंत ठेवावी, असा हल्लाबोलही अंजली दमानिया यांनी केलाय. ‘शिंदे विरोधी पक्षात? विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच कट आहे. सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजप ची script’, असे एका ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. ४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले… दाल मे कूछ काला है, असं म्हणत दमानियांनी संशय व्यक्त केलाय.