Special Report | मविआचे 25 VS भाजपचे 25..नेमकं कोण कुठं जाणार? -Tv9
महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याता दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. कारण या दाव्यावरून महाविकास आघाडीतीलनेते आता दानवेंचा समाचार घेत आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याता दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. कारण या दाव्यावरून महाविकास आघाडीतीलनेते आता दानवेंचा समाचार घेत आहेत. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दानवेंवर खोचक टीका केली. रावसाहेब दानवे भांग तर पीत नाहीत, माझे चांगले मित्र आहेत ते, दिल्लीत ते माझ्या बाजुला राहतात. मात्र त्यांनी हा दावा कोणत्या नशेत केला? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तसेच त्यांना 25 नाही तर 175 आमदार आमच्या संपर्कात आहेत असे बोलायचे असेल. स्पीप ऑफ टंग झाली असेल, आहेत संपर्कात तर घ्यांना, थांबलाय कसासाठी? असा सवालही त्यांनी केलाय. तसेच उद्या मी म्हणतो भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असेही राऊत म्हणाले आहेत.
Latest Videos