पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा; इस्लाम स्वीकारत केला नसरुल्लाशी निकाह, पाहा व्हिडीओ..
राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू या भारतीय महिलेने आपल्या पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न केलं आहे. अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून तिने स्वतःचं नाव आता फातिमा असं ठेवलं आहे.
नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू या भारतीय महिलेने आपल्या पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न केलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या.आपण प्रियकराला फक्त भेटायला आलो आहोत आणि नंतर भारतात परतणार असल्याचं सांगितलं होतं. पण आता वेगळीच माहिती समोर येत आहे. अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरूल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने स्वतःचं नाव आता फातिमा असं ठेवलं आहे. खैबर पख्तनुख्वा या ठिकाणी या दोघांनी निकाह केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अंजू आपल्या प्रियकर नसरुल्लाहसोबत फिरताना दिसत आहे. दोघं एकमेकांच्या हातात हात घालून फिरत आहेत. हा व्हिडीओ पाहून प्री वेडिंग शूट असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
Published on: Jul 26, 2023 08:15 AM