त्याच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी… केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे काय म्हणाले?
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'कधी काळी आम्ही दोघे दारु आणि भ्रष्टाचारा विरोधात एकत्र होतो. मी दारु धोरण बंद करण्याची मागणी केलेली. पण अरविंदच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलच नाही'
ईडीने कथित दारु घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ताब्यात घेतलं आणि अटक केली. याघटनेनंतर आपच्या नेत्यांनी एकच संताप व्यक्त केला. अशातच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कधी काळी आम्ही दोघे दारु आणि भ्रष्टाचारा विरोधात एकत्र होतो. आज तो स्वत: दारु बनवत होता. अरविंदने कधीच माझ ऐकलं नाही. याच मला दु:ख आहे’, अण्णा हजारे यांनी अशी प्रतिक्रिया दिली. ‘मी अनेकवेळा केजरीवालांना दारु धोरण बंद कराव यासाठी पत्र लिहिली. दारु धोरणावर पत्र लिहिण्यामागे माझा उद्देश अन्याय संपवण्याचा होता. दारुच्या कारणांमुळे लोकांच्या हत्येची प्रकरण वाढतात. महिलांवर अत्याचार वाढतो. म्हणून मी दारु धोरण बंद करण्याची मागणी केलेली. पण अरविंदच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलच नाही’, असेही त्यांनी म्हटले.