भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा, महाराष्ट्रातील 'या' तीन नेत्यांची नावं यादीत

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ तीन नेत्यांची नावं यादीत

| Updated on: Jul 29, 2023 | 2:18 PM

VIDEO | भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा, भाजपकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी?

नवी दिल्ली, २९ जुलै २०२३ | भाजपकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत महाराष्ट्रातील तीन नेत्यांनी नावं असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यामध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर राज्यातील तीन नेत्यांचा समावेश आहे तर पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आलं आहे. विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत या तीनही नेत्यांचं अभिनंदन केल्याचेही पाहायला मिळत आहे.

Published on: Jul 29, 2023 02:15 PM