लडेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोज करेंगे , Nawab Malik यांचे ट्वीट
नवाब मलिक यांना त्यानंतर मेडिकला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र मलिकांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास ईडीने मनाई केली होती. तरीही ईडीच्या ताब्यातून झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे अशी घोषणा नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांनी केली आहे.
मुंबई : आज पाहटेपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्र नवाब मलिक (Nawab Malik) यांची चौकशी सुरू होती. त्यांना दुपारी ईडीने (ED) अटक केली. यावेळी दोन्ही बाजुने जारदार राजकीय वार-पलटवार सुरू असताना, ही अटक झाल्याने वातावरण आणखीच तापलं आहे. नवाब मलिक यांना त्यानंतर मेडिकला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र मलिकांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास ईडीने मनाई केली होती. तरीही ईडीच्या ताब्यातून झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे अशी घोषणा नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांनी केली आहे. यावेळी जेजे रुग्णालय परिसरात जिथे मलिकांचे मिडीकल करण्यासाठी नेण्यात आलं तिथेही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचे दिसून आले. ही कारवाई सुडाच्या भावनेतून होत असल्याची खरपूस टीका भाजपकडून करण्यात येत आहे. तर तसे वाटत असेल तर कोर्टात जा, असे भाजप नेते बजावत आहेत.
Latest Videos