शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार

| Updated on: Jul 18, 2022 | 1:29 PM

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रामदास कदम हे शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. रामदास कदम यांचे चिरंजीव काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झाले होते.

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रामदास कदम हे शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. रामदास कदम यांचे चिरंजीव काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोपदेखील केले होते. रामदास कदम हे थोड्याच वेळात आपला राजीनामा मातोश्रीला पाठवण्यात येणार असल्याचं कळतंय. रामदास कदम यांचे पुत्र योगेश हे दापोलीचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांसोबत ते होते. शिवसेनेतील नेत्यांचं पक्ष सोडण्याचं सत्र सुरूच आहे. यापूर्वी 55 पैकी 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलं होतं.

Published on: Jul 18, 2022 01:29 PM