Breaking | परमबीर सिंग यांचा साथीदार रियाज भाटीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

Breaking | परमबीर सिंग यांचा साथीदार रियाज भाटीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

| Updated on: Nov 21, 2021 | 7:03 PM

परमबीर सिंग यांचा साथीदार रियाज भाटीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गँगस्टर रियाझ भाटीसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रियाझ भाटी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशीही रियाझचे सबंध असल्याचं समोर येत आहे. रियाझचा दाऊदच्या टोळीशी संबंध आहे. त्याच्यावर फसवणूक, खंडणी वसुली, जमीन बळकावणे आणि फायरिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 2015 ते 2020 मध्ये बनावट पासपोर्ट बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत देश सोडून पळून जाताना त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, परमबीर सिंग यांचा साथीदार रियाज भाटीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.