मनसेबाबतच्या अपप्रचाराला उत्तर द्या; पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंकडून सूचना

मनसेबाबतच्या अपप्रचाराला उत्तर द्या; पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंकडून सूचना

| Updated on: Aug 23, 2022 | 2:41 PM

"मला वाटतं काही गोष्टी तुमच्याकडून लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमं अनेक राजकीय पक्ष जाणून बुजून काही गोष्टींचा प्रचार करत असतात."

“मला वाटतं काही गोष्टी तुमच्याकडून लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमं अनेक राजकीय पक्ष जाणून बुजून काही गोष्टींचा प्रचार करत असतात. तुम्ही सक्षम आहात. कान डोळे मेंदू आहे. पण उत्तर देताना तुम्ही मला भांबावलेले दिसता. त्यांनी गेल्या काही वर्षात प्रचार केला. राज ठाकरे आणि मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो. त्यांनी एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. टोलचं आंदोलन. 65 ते 67 टोल आपण बंद केले. सेना भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. टोलमुक्त महाराष्ट्र करू. त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. मला वाटतं या गोष्टी तुम्हाला जिल्हा तालुक्यात शहरात बोलता तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले. तुमच्या पक्षांनी काय केलं,” अशा सूचना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Published on: Aug 23, 2022 02:41 PM