VIDEO : Ashish Shelar | राज ठाकरेंची भेट फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीच

VIDEO : Ashish Shelar | राज ठाकरेंची भेट फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीच

| Updated on: Nov 05, 2021 | 2:51 PM

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं आशिष शेलार यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रृत आहे. आशिष शेलार हे दर दिवाळीला राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर येत असतात. आजही त्यांनी सकाळीच कृष्णकुंज गाठलं. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दिवाळी फराळ घेत घेत या दोघांनीही गप्पा मारल्या. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना यावेळी सिनेमावरील एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकावरच दोघांची चर्चा रंगली, असं सूत्रांनी सांगितलं.