Param Bir Singh : अनुप डांगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग, परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

Param Bir Singh : अनुप डांगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग, परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

| Updated on: Apr 21, 2022 | 10:06 AM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची योग्यरित्या चौकशी होत नसल्याची अनुप डोंगेनी तक्रार केली होती. यानंतर अनुप डांगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची योग्यरित्या चौकशी होत नसल्याची अनुप डोंगेनी (Anup Dange) तक्रार केली होती. यानंतर अनुप डांगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्यात आला आहे. गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीरसिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती.

Published on: Apr 21, 2022 10:06 AM