जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्यास कुणाला फटका? किती जण विधानसभेच्या आखाड्यात? कोण नफ्यात, कोण तोट्यात?
महायुती आणि महाविकास आघाडी याशिवाय राज्यात विविध पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचं निर्णय घेतलाय. तर काहीजण वेगळी युती किंवा आघाडी कऱण्याच्या तयारीत आहेत. तसं जर झालं तर कोण नफ्यात आणि कोण तोट्यात राहणार?
यंदाची लोकसभा निवडणूक जशी ऐतिहासिक समीकरणांनी झाल्याचे पाहायला मिळाले तशीच विधानसभा निवडणूकही होणार का? याबद्दल विविध कयास बांधले जाताय. कारण लोकसभेच्या वेळी पहिल्यांदाच भाजप vs काँग्रेस, शिवेसना vs शिवसेना आणि राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास विरूद्ध महायुती या लढती सोबत आघाडी किंवा युती निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करतायतं. मनसे, वंचित हे स्वबळावर लढणार असून मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार देण्याची घोषणा केली तर बच्चू कडू यांनी जर तरची भाषा वापरली. दरम्यान संभाजीराजे आणि रविकांत तुपकर यांच्यात आघाडीची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी एमआयएमसोबत भेट घेतल्यामुळे त्यांच्याही युतीच्या चर्चा रंगताय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याव्यतिरिक्त अनेक समीकरण तयार झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा महायुतीला होईल असा अंदाज वर्तविला जातोय.