छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ‘अखंड भारत’ संकल्पनेचा अनोखा देखावा, बघा व्हिडीओ
VIDEO | नाशिकच्या इंदिरानगर या परिसरात 'अखंड भारत' या संकल्पनेचा साकरला देखावा, बघा व्हिडीओ, शिवजयंती निमित्त उत्साहाचं वातावरण
नाशिक : 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यभरात शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिकमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी विविध संकल्पनेचे देखावे सादर केले आहे. असाच एक ‘अखंड भारत’ या संकल्पनेचा देखावा नाशिकच्या इंदिरानगर या परिसरात साकारण्यात आलाय. हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपचे नेते यांच्याकडून सातत्याने ‘अखंड भारत’ या संकल्पनेचा जागर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने अखंड भारताचे स्वप्न साकार करण्याचा विश्वास या देखाव्याच्या माध्यमातून करत असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.