Santosh Deshmukh Case : ‘आका’ म्हणतो मला सोडा… वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज, सुनावणीत काय घडलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडने निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला आहे. तर याच प्रकरणामध्ये दुसरा आरोपी विष्णू चाटेने आपल्याला लातूरमधून बीडच्या तुरुंगामध्ये हलवावं अशी मागणी न्यायालयापुढे केली आहे. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींनी काढलेला व्हिडिओ आज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे सादर केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज सादर केलाय. बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. पहिल्यांदा वाल्मिक कराडच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात सादर केला. याचा उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. यावर 24 तारखेला सीआयडी आपलं म्हणणं मांडणार आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केले. सरकारी वकिलांनी सादर केलेला पेन ड्राइव्ह आम्हाला मिळावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यावर आम्ही पुरावे लगेच देत आहोत असं उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिलं. हे पेन ड्राइव्ह कुठल्याही परिस्थितीत बाहेर जात कामा नये, अशी विनंती निकम यांनी न्यायालयाला केली आहे. वाल्मिक कराड फरार असतानाच्या काळात प्रॉपर्टी सील करण्यासंदर्भातला अर्ज आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्या अर्जाची प्रत मिळावी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. त्यानंतर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी विष्णू चाटे सध्या लातूरच्या कारागृहात आहे. आपल्याला लातूरमधून बीडमध्ये हलवावे अशी विनंती विष्णू चाटेच्या वतीने करण्यात आली आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
