‘तर माझ्या एवढा वाईट…’, शिंदेंचे आमदार संतोष बांगर अन् कृषी अधीक्षकांमध्ये वाद; व्हिडीओ व्हायरल
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षक यांना दम दिल्याचेच पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर शिंदेंचे आमदार संतोष बांगर आणि कृषी अधीक्षकांमधील झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेमका वाद काय झाला ?
हिंगोली, ६ मार्च २०२४ : एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनेतील हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे कृषी अधीक्षक यांच्यात चांगलाच वाद झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या पैशांवरून हा वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षक यांना दम दिल्याचेच पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर शिंदेंचे आमदार संतोष बांगर आणि कृषी अधीक्षकांमधील झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाहीतर माझ्या एवढा वाईट कुणी नाही, असे संतोष बांगर यांनी हिंगोलीच्या कृषी अधीक्षकांना म्हटले आहे. चार दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे नाही भेटले तर माझ्या एवढं वाईट कुणी नाही ध्यानात ठेवा म्हणत संतोष बांगर यांनी हा दम थेट कृषी अधीक्षकांना दिला आहे.
Published on: Mar 06, 2024 02:05 PM
Latest Videos