मनोज जरांगे पाटील यांची हिमंत असेल तर... छगन भुजबळ यांचं ओपन चॅलेंज काय?

मनोज जरांगे पाटील यांची हिमंत असेल तर… छगन भुजबळ यांचं ओपन चॅलेंज काय?

| Updated on: Feb 01, 2024 | 12:32 PM

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरक्षणाची लढाई आता मंडल आयोगालाच कोर्टात आव्हान देण्यापर्यंत पोहोचली आहे. भुजबळांनी मराठ्यांच्या कुणबी आरक्षणाला विरोध केला तर मंडल आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा

मुंबई, १ फेब्रुवारी, २०२४ : छगन भुजबळ यांच्याविरोधावरून मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला. यावरून मंत्री भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रतिआव्हान दिलं. हिमंत असेल तर कोर्टात आव्हान द्या, असं भुजबळ म्हणाले तर दुसरीकडे सगेसोयरे अधिसूचनेविरोधातही हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरक्षणाची लढाई आता मंडल आयोगालाच कोर्टात आव्हान देण्यापर्यंत पोहोचली आहे. भुजबळांनी मराठ्यांच्या कुणबी आरक्षणाला विरोध केला तर मंडल आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिआव्हान देत हिमंत असेल तर कोर्टात जाऊन दाखवा, असा प्रतिइशारा दिलाय. बघा स्पेशल रिपोर्ट काय रंगली छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी?

Published on: Feb 01, 2024 12:32 PM