रामाच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरी यांच्यात ‘महाभारत’
रामाबद्दल केलेल्या वक्तव्यानं जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा देत गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं होतं. तर यावर आव्हाडांनी अमोल मिटकरी यांच्यावर पलटवार करत तुम्ही तुमची जुनी वक्तव्य बघा, अशी टीका केली.
मुंबई, १० जानेवारी २०२४ : रामाबद्दल केलेल्या वक्तव्यानं जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा देत गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं होतं. तर यावर आव्हाडांनी अमोल मिटकरी यांच्यावर पलटवार करत तुम्ही तुमची जुनी वक्तव्य बघा, अशी टीका केली. तर मिटकरी यांची जुनी विधानं चर्चेत आली असताना पगारी माणसानं उंची प्रमाणे बोलावं, असं म्हणत आव्हाडांनी उत्तर दिलं. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण करत अजित पवार यांनी आधी पुण्याकडे लक्ष घालण्याचा सल्ला दिलाय.
Published on: Jan 10, 2024 11:55 AM
Latest Videos