Aurangabad | अर्जुन खोतकरांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याची इन्कम टॅक्स, ED कडे तक्रार
किरीट सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.
शरद पवार म्हणाले अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. पण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जेलमध्ये टाकलं. ही धमकी कुणाला देता, धमक्यांची सिरीज सुरु करा. 23 जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय. अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे. मुळे आणि तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या, असा दावा सोमय्या यांनी केलाय.