शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जावयाला अटकपूर्व जामीन, काय आहे प्रकरण?
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांना मोठा दिलासा, जावई विजय झोलसह ८ जणांना जामीन मंजूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई आणि क्रिकेटर विजय झोल यांच्यासह ८ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. क्रिप्टो करन्सी प्रकरणातील आरोपीला धमकावल्याचा आरोप विजय झोल यांच्यावर होता. तर उद्योजकाला गुंडाच्या मदतीने धमकावल्या प्रकरणी किरण खरात यांच्या तक्रारीवरून विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विजय झोल हे अर्जुन खोतकर यांचे जावई असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग आला होता. दरम्यान, या प्रकऱणी विजय झोल आणि त्यांचे बंधू विक्रम झोल यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या दोघांना व्यक्तीगत जात मचुलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Published on: Feb 01, 2023 07:33 AM
Latest Videos