Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
Terrorist houses demolished Kashmir : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आत्तापर्यंत एकूण 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आत्तापर्यंत एकूण 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबारा, शेपीयान या भागात ही कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांच्या पथकाने दहशतवादी अदनान शफीचे घर पाडले होते. अदनान २०२४ मध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि गेल्या एक वर्षापासून तो खोऱ्यात सक्रिय होता. बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनीतील जमील अहमद आणि जैनापोरा येथील अदनान शफी यांच्याव्यतिरिक्त सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांची घरे पाडली त्यात फारूक, अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुरान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे, त्रालमधील खासीपोरा येथील अमीर नजीर आणि कुलगाममधील मतलहमा येथील जाहिद अहमद घनी यांचा समावेश आहे.

राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त

पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल

पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
