धुळे जिल्ह्यात मका पिकांवर असं काय झालं की शेतकरी संकटात सापडला, घोंगावतयं दुबार पेरणीचंही संकट
गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्हायात दमदार पाऊस झाला होता. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दांडी मारली होती. आताही काही जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. ज्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
धुळे : 24 ऑगस्ट 2023 | राज्यात अनेक भागात पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. पण धुळे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः मेटा कुटीस आला आहे. एकीकडे राज्यात इतर जिल्ह्यात पाऊस धो धो कोसळत असताना धुळे जिल्ह्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. 22 जुलै पासून जिल्ह्यात दमदार पाऊसच नसल्याने खरिपाची पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तर दुसरीकडे मक्याची दुबार पेरणी करावी लागली असून मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मक्यावर मोठ्या प्रमाणात पांढरी आळी पडल्यामुळे तो वाढत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.