ऐन लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी दिलासा देण्यात आला आहे. सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकांचे तीन टप्पे पार पडल्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला अंतरिम जामीन मंजूर
राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी दिलासा देण्यात आला आहे. सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकांचे तीन टप्पे पार पडल्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोकळीक दिली आहे. दरम्यान, 25 मे रोजी दिल्लीत लोकसभेचं मतदान पार पडणार असून 6 जागांवर हे मतदान होणार आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला असला तरी 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार असल्याची माहिती मिळतेय.