मनसेचा झेंडा बदलला तसा विचारही बदलला – अरविंद सावंत
महाविकास आघाडीवर टीका करणारी मनसे (mns) ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता भाजपचे कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]
महाविकास आघाडीवर टीका करणारी मनसे (mns) ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता भाजपचे कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. संदीप देशापांडे सोडा. ते फक्त पांडे आहेत, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटले म्हणून काही फरक पडत नाही. फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून एकमेकां साह्य करू सुरू आहे. फडणवीस हे अनाजीपंत झालेत. ते फडणवीस राहिले नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
Latest Videos