राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहिममधील अनधिकृत बांधकाम हटवलं, शिवसेनाची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 23, 2023 | 2:30 PM

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी काल इशारा दिला. त्यानंतर आज प्रशासनाच्या वतीने आज माहिममध्ये कारवाई करण्यात आली. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदाराने प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

नवी दिल्ली : राज ठाकरे यांनी काल इशारा दिल्यानंतर आज प्रशासनाच्या वतीने आज माहिममध्ये कारवाई करण्यात आली. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनधिकृत कामं खूप होत असतात. त्यातलं एक बांधकाम हटवलं. त्यात नवीन काही नाही, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. कालच्या सभेत राज ठाकरेंनी देश राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला नाही.राज ठाकरेंना वेदना होत असतील तर त्यांनी शिवसेना सोडली नसतं. राज ठाकरे पक्षाबाहेर बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत. बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. बाळासाहेबांनीही एकदा मुलाखतीत ते सांगितलंय, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

Published on: Mar 23, 2023 02:30 PM
संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडे शिवसेनेच्या संसदीय नेतेपदाची जबाबदारी
‘संजय राऊत एक्सपायरी डेट औषध’, कुणी केली खोचक टीका