Aryan Khan Bail | आर्यनची आज सुटका नाहीच, मात्र आर्यनच्या स्वागतासाठी ‘मन्नत’वर रोषणाई
आज आर्यनची जेलमधून सुटका होईल, अशी चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं निवासस्थान असलेल्या मन्नत बंगल्यावर रोषणाई करण्यात आलीय. पण आर्यनची आज जेलमधून सुटका होऊ शकलेली नाही. पण उद्या सकाळी त्याची सुटका होण्याची शक्यता आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आज जामीन मिळणार नाहीय. कारण जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही. विशेष म्हणजे आज आर्यनची जेलमधून सुटका होईल, अशी चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं निवासस्थान असलेल्या मन्नत बंगल्यावर रोषणाई करण्यात आलीय. पण आर्यनची आज जेलमधून सुटका होऊ शकलेली नाही. पण उद्या सकाळी त्याची सुटका होण्याची शक्यता आहे.
Latest Videos