Nawab Malik | क्रूझ पार्टीमधील दाढीवाल्याबाबत अद्याप कारवाई का झाली नाही? : नवाब मलिक

Nawab Malik | क्रूझ पार्टीमधील दाढीवाल्याबाबत अद्याप कारवाई का झाली नाही? : नवाब मलिक

| Updated on: Oct 28, 2021 | 7:24 PM

नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता. ड्रग्ज पाटीर्तील रेडचा खेळ संपला असला तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेरचं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक यांनी केला होता. क्रुझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं त्या फुटेजमध्ये ड्रग्ज माफिया आणि त्याची प्रेमिका क्रूझवर होती, असं एका व्हिडीओत दिसून येत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

कॉर्डिलिया क्रुझवर त्या दिवशी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्याच्या प्रेमिकेसह होता. त्याच्या प्रेमिकेकडे बंदूक देखील होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. कासिफ खान हा काही दिवस तिहार तुरुंगात असल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी क्रुझवर होता. ड्रग्ज पाटीर्तील रेडचा खेळ संपला असला तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू बाहेरचं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक यांनी केला होता. क्रुझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं त्या फुटेजमध्ये ड्रग्ज माफिया आणि त्याची प्रेमिका क्रूझवर होती, असं एका व्हिडीओत दिसून येत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी आरोप केलेला तो ड्रग्ज पार्टीतील माफिया हा कासिफ खान असल्याची सूत्रांची माहिती आहे.

कासिफ खान हा भारतातील फॅशन टीव्हीचा प्रमुख असल्याची समोर आलं आहे. नवाब मलिकांनी आरोप केलेला दाढीवाला व्यक्ती कासिफ खान असून तो क्रुझवर त्याच्या प्रेमिकेसह डान्स करताना दिसून येत आहे. कासिफ खान हे क्रुझवरील पार्टीच्या आयोजकांपैकी एक असल्याचं समोर आलं होतं.