Aryan Khan Bail | आर्यन खानची तुरुंगातून सुटका होणार ?
आर्यन खानला (Aryan Khan) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता त्याच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी (29 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर आर्यनला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागेल आणि त्यानंतर उद्या (30 ऑक्टोबर) रोजी सकाळी त्याची सुटका होईल.

तज्ज्ञांच्या मते, मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन आदेशाची प्रत (तपशीलवार आदेशाची प्रत किंवा ऑपरेटिव्ह भाग) विशेष एनडीपीएस न्यायालयात जमा करावी लागते. विशेष NDPS न्यायालय आरोपीच्या नावावर ‘रिलीज ऑर्डर’ जारी करते आणि सुरक्षेसाठी जामिनाची रक्कम किंवा वैयक्तिक बाँड तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करते. हा सुटकेचा आदेश आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात आला आहे.
Latest Videos