MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 20 October 2021
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.
आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. गेल्या गुरुवारी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.