Aryan Khan | आर्यन खानचा जामीन विशेष न्यायालयाने नेमका का फेटाळला ?

Aryan Khan | आर्यन खानचा जामीन विशेष न्यायालयाने नेमका का फेटाळला ?

| Updated on: Oct 20, 2021 | 7:24 PM

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला 13 दिवसानंतरही जामीन का मिळत नाही? त्यामागची कारणे काय आहेत? आर्यन खान विरोधात एनसीबीकडे सज्जड पुरावे असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यासाठी एनसीबीने काही कारणं कोर्टापुढे मांडली आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्यन खान हा नियमित ड्रग्ज घेत होता. तो ड्रग्ज घेणारा नियमित ग्राहक होता.

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला 13 दिवसानंतरही जामीन का मिळत नाही? त्यामागची कारणे काय आहेत? आर्यन खान विरोधात एनसीबीकडे सज्जड पुरावे असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यासाठी एनसीबीने काही कारणं कोर्टापुढे मांडली आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्यन खान हा नियमित ड्रग्ज घेत होता. तो ड्रग्ज घेणारा नियमित ग्राहक होता.

ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचा तपास करण्यात आला असता त्यात ड्रग्ज रॅकेटशी संबंधित अनेक बाबी एनसीबीला आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं. एका नवोदित अभिनेत्रीसोबतचे आर्यनचे चॅटही एनसीबीच्या हाती लागले आहेत.

आर्यनचे इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलर्ससोबत कनेक्शन असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला आहे. त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. त्याचा अधिक तपास करायचा असल्याने आर्यनला सोडू नये असं एनसीबीचं म्हणणं आहे. आर्यनचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ड पेडलर्स सोबत कनेक्शन आहेत. तो बाहेर आल्यास पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी मागणी एनसीबीने केली होती. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. त्यामुळे त्याची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली होती.