मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची नाशिकमध्ये तपासणी. हेलिपॅडवर उतरल्यानंतर लगेच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्री दाखल होताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय. परंतू तपासणीनंतर शिंदे यांच्या बॅगांमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे प्रचार सभेसाठी गेले असता त्यांच्या सोबत पैशांच्या बॅगा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज जेव्हा एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी केली.