'तो' प्रश्न करताच सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या देवेन्द्रजी 'आप से ये उम्मीद न थी'

‘तो’ प्रश्न करताच सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या देवेन्द्रजी ‘आप से ये उम्मीद न थी’

| Updated on: Feb 14, 2023 | 2:42 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद न्यायालयात सुरु आहे. त्यावर आज सुनावणी होत आहे. पण यात सत्याचाच विजय होईल. आज काय होतेय ते पाहू, सत्यमेव जयते असेच काही होईल

परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद न्यायालयात सुरु आहे. त्यावर आज सुनावणी होत आहे. पण यात सत्याचाच विजय होईल. आज काय होतेय ते पाहू, सत्यमेव जयते असेच काही होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. परभणी येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना सकाळच्या त्या शपथविधीची कल्पना होती असे विधान केलं. देवेंद फडणविस यांना मी सुसंस्कृत राजकारणी मानत होते. पण त्यांनी माझी अपेक्षा फोल ठरवली. ते जे बोलले ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. त्यांच्यावर इतकी जबाबदारी आहे की डेव्हलपमेंट ओरिएंटेड बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी जी स्क्रिप्ट लिहिली आहे त्याच्या पुढची स्क्रिप्ट लिहायला सांगा. मी खोटे बोलत नाही पण दुसऱ्यांची गॅरंटी मी कशी देणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Feb 14, 2023 02:42 PM