Kirit Somaiya | डिमोलिशन नोटीस येताच राज्यपालांकडे अनिल परबांचा राजीनामा मागणार - किरीट सोमय्या

Kirit Somaiya | डिमोलिशन नोटीस येताच राज्यपालांकडे अनिल परबांचा राजीनामा मागणार – किरीट सोमय्या

| Updated on: Dec 25, 2021 | 4:28 PM

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यानंतर आता अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडेल, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यानंतर आता अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडेल, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. अनिल परब यांनी अनधिकृतपणे सीआरझेडमध्ये (CRZ) बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता लवकरच या बेकायदेशीर (Illegal) रिसॉर्टवर हातोडा पडेल, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याची खूप प्रयत्न केले असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. पर्यावरण मंत्रालयानं अनिल परब यांना नोटीस पाठवली असून त्यांना 3 तारखेपर्यंत या नोटिसीला उत्तर द्यावं लागणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 5 ते 7 तारखेपर्यंत रिसॉर्ट तोडण्याचे आदेश राज्य सरकारकडे येतील, असं भाकितही किरीट सोमय्या यांनी केलंय.

दरम्यान, अनिल परब यांचं रिसॉर्ट तुटण्यासोबत त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून याचीही चौकशी केली जावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्याचा आदेश निघाल्यानंतर आम्ही राज्यपालांकडे अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तर अनिल परबांची आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचही सोमय्या म्हणालेत.