शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, सरकारलाच उत्तर देता न आल्यानं विरोधकांचा सभात्याग
शिंदे-फडणवीस-पवार सरकारची शेती, खतांच्या किंमती आणि बोगस बियाणांवरून चांगलीच गोची झाल्याचे समोर आले आहे. या अधिवेशनात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांनी बोगस बियाणांवरून सरकारला घेरलं.
मुंबई, 19 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस-पवार सरकारची शेती, खतांच्या किंमती आणि बोगस बियाणांवरून चांगलीच गोची झाल्याचे समोर आले आहे. या अधिवेशनात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांनी बोगस बियाणांवरून सरकारला घेरलं. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झालेल्या असताना राज्यातही २० टक्के किमती कमी करणार का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तर खताच्या किमती स्थिर नाहीत. नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कर्जमाफीवरून सरकारला घेरताना शेतकऱ्यांकडे आणि खरिप हंगामावरच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यावरून सरकारला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता आले नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला.