हाती टाळ, कपाळी बुक्का अन् वारकऱ्यांची वेशभूषा… हर्षवर्धन पाटील तुकोबांच्या पालखीत रमले
आज पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील सहभागी झालेत. यावेळी त्यांच्या हाती टाळ, कपाळी चंदन आणि बुक्क्याचा टिळा यासोबत वारकऱ्यांच्या पोषाखात हे पाहायला मिळाले. पारंपारिक वेशभूषा करत आणि हाती टाळ घेत हर्षवर्धन पाटील तुकोबांच्या पालखीत सहभागी झाल्यानंतर रमल्याचे पाहायला मिळाले.
मागील एक आठवड्यापासून माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक तथा कार्यकर्ते हे भाजप पक्षावरती नाराज असल्याचे दिसून येत आहे, अनेक ठिकाणी गावी इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून 2024 विधानसभेला निवडणूक लढवावी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. भाजप पक्ष आपल्याला नेहमीच डावलत आलेला आहे, भाजप पक्षासाठी हर्षवर्धन पाटलांनी खूप काय केले आहे, मात्र भाजप पक्ष हा पाटील यांना डावलत असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी येत्या 2024 च्या विधासभेच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून विजयी व्हावे अशी इच्छा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांची आहे. असे असताना आज पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील सहभागी झालेत. यावेळी त्यांच्या हाती टाळ, कपाळी चंदन आणि बुक्क्याचा टिळा यासोबत वारकऱ्यांच्या पोषाखात हे पाहायला मिळाले.