विठुमाऊलीचा नाद… किडनी फेल, वर्षभरात तीन मोठे ऑपरेशन्स… तरी 70 वर्षाच्या अजोबांची पायी वारी
संत तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूर शहरात आज मुक्कामी असणार आहे. तर तुकोबा माऊलींच्या दुसरं गोल रिंगण आज इंदापूरमध्ये होणार आहे. पालखी आजच इंदापूर येथे दाखल होणार आहे. पण दिंड्या, वारकरी इंदापूर शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूर शहरात आज मुक्कामी असणार आहे. तर तुकोबा माऊलींच्या दुसरं गोल रिंगण आज इंदापूरमध्ये होणार आहे. पालखी आजच इंदापूर येथे दाखल होणार आहे. पण दिंड्या, वारकरी इंदापूर शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. यावारीत किडनी फेल वर्षभरात तीन ऑपरेशन्स झाले तरी विठुरायाचा भक्त चालत असल्याचे पाहायला मिळाले. सत्तर वर्षांच्या या आजोबांची गेल्या वर्षी तीन ऑपरेशन झालीत. आयुष्यात येऊन एकदा वारी करावी या हेतून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतोय, अशा भावना आजोबांनी व्यक्त केल्यात. हा देह विठुरायाचा आहे. आई गेल्यावर आणि विठू माऊली भेटल्यावरच आमच्या वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अजून थोडे वर्ष हा देह जिवंत ठेव म्हणजे तुला भेटायला येता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर यंदा कुणाची तिसावी वारी तर कुणाची पहिली वारी असल्याचे पाहायला मिळाले.