Ashadhi Ekadashi 2024 : हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर तुम्ही पाहिलंय? तब्बल 46 वर्षांनी आलं पाण्याबाहेर

Ashadhi Ekadashi 2024 : हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर तुम्ही पाहिलंय? तब्बल 46 वर्षांनी आलं पाण्याबाहेर

| Updated on: Jul 17, 2024 | 1:59 PM

दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर हे नेहमी हिडकल धरणाच्या पाण्यात असते. हे हेमाडपंथी विठ्ठल मंदिर जवळजवळ 46 वर्षे अज्ञात होते. या मंदिराबद्दल फार क्वचित लोकांना माहिती होते. मात्र हिडकल धरणाचं पाणी आटल्याने हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर सर्वांना दिसून आले आहे

बेळगावातील दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिराची ड्रोनच्या कॅमेऱ्यात दुश्य कैद करण्यात आली आहे. दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर हे नेहमी हिडकल धरणाच्या पाण्यात असते. हे हेमाडपंथी विठ्ठल मंदिर जवळजवळ 46 वर्षे अज्ञात होते. या मंदिराबद्दल फार क्वचित लोकांना माहिती होते. मात्र हिडकल धरणाचं पाणी आटल्याने हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर सर्वांना दिसून आले आहे. विशेष म्हणजे आज आषाढी एकादशीचा दिवस असून सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच विठ्ठल भक्तांसाठी ही घटना म्हणजे आनंदाची पर्वणीच म्हणता येईल. दरम्यान, लाखो वारकरी विठुरायाच्या पंढरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली.

Published on: Jul 17, 2024 01:59 PM