Ashadhi Ekadashi 2024 : जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला… बघा आषाढी एकादशीच्या महापूजेनंतरचं विठुरायाचं गोजिरं रुप
लाखो वारकरी विठुरायाच्या पंढरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली.
विठुरायाच्या नामघोषांनी अवघी पंढरी दुमदुमतेय. असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सर्वत्र महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. लाखो वारकरी विठुरायाच्या पंढरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. तर यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपुरातील या शासकीय महापूजेनंतर बघा सावळ्या विठुरायाचं गोजिरं रूप….