Ashadhi Ekadashi 2024 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास…
आजपासून पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. आजपासून येत्या २५ जुलैपर्यंत पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे दरवाजे २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून विठुरायाच्या भक्तांना कधीही विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
विठ्ठल भक्त आणि समस्त वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. आजपासून येत्या २५ जुलैपर्यंत पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे दरवाजे २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून विठुरायाच्या भक्तांना कधीही विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने निर्णय घेतला आहे. आषाढी वारी निम्मित मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि विठ्ठल भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सर्वांचे दर्शन व्हावे आणि विठ्ठल-रूक्मिणीचे पदस्पर्श आणि मुखदर्शन जास्तीत जास्त भक्तांना घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.