Special Report | Russia-Ukraine युद्धात युक्रेनमधील शहरांची राखरांगोळी
रशिया (russia) आणि युक्रेनच्या (ukarine) युद्धाचा (war) आज 10 वा दिवस आहे, रशियाने युक्रेनवरती हल्ला केल्यापासून युक्रेनमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर हल्ला केलेल्या परिसरात अनेक मृतदेह पाहायला मिळत आहेत.
रशिया (russia) आणि युक्रेनच्या (ukarine) युद्धाचा (war) आज 10 वा दिवस आहे, रशियाने युक्रेनवरती हल्ला केल्यापासून युक्रेनमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर हल्ला केलेल्या परिसरात अनेक मृतदेह पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव मधील सरकारी कार्यालये उद्वस्त केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिथले नागरिक भेटले मार्गाने इतर देशात स्थलांतर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत रशियाने सातत्याने बॉम्ब हल्ले सुरू ठेवल्याने युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे. रशियाच्या मीडियाने झेलेन्स्की हे पोलंडमध्ये पळून गेल्याचा दावा केला होता. परंतु ते कीव मध्येचं असल्याचे युक्रेन म्हणत आहे. नुकतेच झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून युरोप वासियांना एक मॅसेज दिला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, जर युक्रेन वाचलं नाही, तर युरोप सुध्दा वाचू शकणार नाही. त्यामुळं आमच्या समर्थनार्थ उभे राहा, असा मॅसेज त्यांनी दिल्याने युरोपमध्ये खळबळ माजल्याचे वृत्त आहे.