करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण, कुठं घडतोय धक्कादायक प्रकार?
VIDEO | करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे, हिंदुत्वादी संघटना रस्त्यावर
नाशिक : मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली एका संस्थेकडून रविवारी धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांनीही कारवाई करत महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या आरोपाची गांभीर्याने दखल घेतल्याचे सांगितले जात आहे. मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पुण्यातील ‘सत्य मलिक लोक सेवा ग्रुप’ कडून अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप झाला. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.