औरंगजेबाची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घेतलीय का? आशिष शेलारांचा सवाल पाहा Video

तुम्ही समाजा-समाजातल्या विभागण्या का करत आहात? धर्म आणि जात याची पेरणी का करत आहात?

औरंगजेबाची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घेतलीय का? आशिष शेलारांचा सवाल पाहा Video
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 3:58 PM

मुंबईः महाराष्ट्रावर मराठी माणसांवर कब्जा करण्याचं स्वप्न औरंगजेब (Aurangzeb) पूर्ण करू शकला नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतलीय का असा, सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या धोरणांवर तीव्र टीका केली. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने वापरलेल्या मराठी मुस्लिम या शब्दावरून भाजपने तीव्र आक्षेप घेतला. मराठी माणसांना फसवण्याचा आणि मुस्लिम मतांना भुलवण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

ते म्हणाले, ‘ प्रत्येक पक्षाला त्यांची ध्येय धोरण राबवण्याचं स्वातंत्र्य असतं. पण पक्षाच्या धोरणांमुळे उद्या काही सामाजिक प्रश्न उपस्थित होणार असतील तर ते वेळीच जनतेसमोर आणले पाहिजेत. 22 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये एक बातमी वाचली असेल. मुखपत्रावर ठाकरे गटाला मराठी मुस्लिम यांचं समर्थन.. या शीर्षकाखाली काही लोकांचं समर्थन असल्याचं सांगण्यात आलं.

नीट बघितलं तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा नवीन विचार शिवसेना ठाकरे गटाने हळूवारपणे पेरला आहे. या विचारात लांगूलचालनाचा राजकीय स्वार्थी वास आहे. एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी, मुंबई पालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटाचा हा प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

‘ठाकरे गटाला आपली धोरणं स्पष्ट बोलता येत नाहीत, त्यामुळे त्यांनी मराठी मुस्लिम असा शब्द वापरला. हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम लगेच काही संपादकांनी सुरु केलं.’

आजा तुम्हाला जाती आणि धर्मावर मतं मागण्याची वेळ का आली? ही पेरणी करण्याची गरज का पडली? तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे. त्याहीपुढे पोटनिवडणुकीत लाल बावट्याबरोबरही गेलात. समर्थन मागितलं. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्यावर तुम्ही समाजा-समाजातल्या विभागण्या का करत आहात? धर्म आणि जात याची पेरणी का करत आहात?

भाजपची भूमिका स्पष्ट आहे. जात किंवा धर्मावर नाही तर विकासाच्या नावावर आम्ही मतांची बेगमी करणार आहोत.

मराठी मुस्लिम चालतो तर मराठी – हिंदू या विषयाला का फारकत घेत आहात? असा सवाल त्यांनी केला.

मराठी माणसांवर कब्जा करण्याचं स्वप्न बघून औरंगाबजेब खस्ता झाला. परागंदा झाला. ते स्वप्न उद्धवजी मराठी माणसांवर का लादतायत? औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीय का? असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.