मुंबई पालिकेत महापौर कोण होणार, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं…
VIDEO | मुंबई पालिकेत भाजप-शिवसेना युती १५१ चा आकडा गाठेल, आशिष शेलार यांना विश्वास तर उदय सामंत म्हणताय...
मुंबई : मुंबई पालिकेत भाजपचा महापौर बसेल. मुंबई पालिकेत भाजप आणि शिवसेना युती १५१ चा आकडा गाठेल, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला तर भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचा पुढील महापौर हा भाजपचा असेल हे विधान केले होते. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशिष शेलार कार्यकर्त्यांना म्हणाले, आपली सत्ता आणण्यासाठी तुम्ही सगळी ताकद लावा. तर ठाकरे गटाबद्दल बोलताना ते म्हणाले, मुंबईकरांनी यांना नाकारलंय, झिडकारलंय, मुंबईकरांनी त्यांना आपलं म्हणणं टाळलंय, भाजपचं मुंबईत मिशन १५० आहे. ते आपल्याला पूर्ण करायचंय. यावर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, मुंबई पालिकेत कोणाचा महापौर बसणार याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी मंत्र्यांनी केलेले ते वक्तव्य असतं. पण याबाबतचा निर्णय हे नेतेच घेतील जर तुम्हाला माझ्याकडून टॅग लाईन पाहिजे असेल तर शिवसेना 288 विधानसभेच्या जागा लढणार, असे खोचकपणेही उदय सामंत यांनी म्हटले.