निकालाच्या दिवशीच महाविकास आघाडी फुटेल, आशिष शेलार यांचा दावा
शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर लोकसभा निवडणूकीत म्हणाव्या तशा जागा उद्धव ठाकरे यांना मिळाल्या नसल्याने त्यांनी आता विधानसभा निवडणूकीसाठी तयारी सुरु केली आहे. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली आहे.
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना दिल्लीत जाऊन नक्की काय मिळाल ? काय महाराष्ट्राला मिळालेय, शेतकऱ्यांना काय मिळाले आहे की येथील कष्टकऱ्यांसाठी त्यांनी निधी आणालाय..मग ते दिल्लीला का गेले ? ते दिल्लीला केवळ आपल्या स्वार्थासाठी गेले आहेत. मला जास्त जागा द्या, मला मुख्यमंत्री पद द्या या मागणीसाठी ठाकरे दिल्लीला गेले आहेत. महाविकास आघाडीचे खरे तर तिकीट वाटपाच्या वेळीच गणित बिघडेल परंतू हे बळेबळे कसे तरी विधानसभा निवडणूकापर्यंत तगतील. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांच्या निकाल ज्या दिवशी जाहीर होतील त्याच दिवशी महाविकास आघाडी फुटेल असे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत निवडूका लढविल्या. या निवडणूकांत ठाकरे यांनी सहानुभूती मिळाली असली तरी म्हणाव्या तशा जागा उद्धवना मिळाल्या नाही. त्यांमुळे त्यांनी आता विधानसभा निवडणूकीसाठी तयारी सुरु केली आहे. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली आहे.