Kishori Pednekar | ‘आशिष शेलार तुम्हाला चॅलेंज आहे, नुसतं बोलू नका’
मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला.
मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होता असा दावा केला होता. त्यावरून महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला. नुसता आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असं सांगतानाच आमदार, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलारांवर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरून सर्वांना सातत्याने सतर्क राहण्यास सांगतात.
Latest Videos