मुख्यमंत्रिपद गेलं, चिन्ह-पक्ष गेला, मंत्री आमदारही गेले, आता दारोदारी फिरावं लागतंय; उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
Ashish Shelar on Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपद, पक्ष अन् चिन्हावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
कोल्हापूर : मुख्यमंत्रिपद गेलं, चिन्ह-पक्ष गेला, मंत्री-आमदारही गेले, आता दारोदारी फिरावं लागतंय, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा आणि चिलीम ओढणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख असतो, असंही शेलार म्हणालेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या मुद्द्यावरही शेलार यांनी टीका केली आहे. जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ चर्चा करतील. दोन्ही पक्षांची युती मजबूत आहे. सरकार मजबूत आहे. त्यामुळे योग्यवेळी जागावाटपावर आम्ही बोलू, असंही आशिष शेलार म्हणालेत.