Ashish Shelar | सत्तेचा दुरूपयोग करून खोटा माझ्यावर गुन्हा, आशिष शेलारांचा पलटवार

Ashish Shelar | सत्तेचा दुरूपयोग करून खोटा माझ्यावर गुन्हा, आशिष शेलारांचा पलटवार

| Updated on: Dec 09, 2021 | 12:32 PM

पोलीस दलाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

पोलीस दलाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. भाजप या गोष्टींना दबणार नाही.आशिष शेलार तर झुकणार नाही. नायर रुग्णालयात चार महिन्याच्या बाळाला उपचार का मिळाला नाही. त्या बाळाच्या वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू का झाला? हे प्रश्न विचारत आहे. सत्य बाहेर येईलच, जी चौकशी करायची आहे ती करा सत्य बाहेर येईल, असं आशिष शेलार म्हणाले. यावर जी पावलं उचलली पाहिजेत ती मी उचलणार आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

Published on: Dec 09, 2021 12:32 PM