Ashish Shelar : आशिष शेलार म्हणतात, आमचं ठरलंय, आधी लगीन कोंढाण्याचं…

| Updated on: Aug 15, 2022 | 7:49 PM

आमचं ठरलंय, असं होर्डिंग दिसते. मुंबई महापालिकेत आधी लगीन कोंढाण्याचं हे आमचं ठरलं, असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

मुंबई : शहर भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोरील दोन आव्हान सांगितली. भ्रष्टाचार नाहीसा करणं, सामान्यांच्या मर्यादा उखडून फेकायचं आहे. त्यांचं म्हणणं हे मुंबई महापालिकेला लागू पडत असल्याचं शेलार म्हणाले. भ्रष्टाचाराची बजबजपुरी उखडून फेकल्या पाहिजे. मुंबईतील पंचवीस वर्षांतील घराणेशाहीची बजबजपुरी संपवायची आहे. सगळे मिळून आकडा ठरवू. संपूर्ण बहुमतासाठी काम सुरू आहे. विश्वास, आत्मविश्वास आहे. मुंबईत आता परिवारवाद नको. सगळ्यांना स्थान मिळावं, यासाठी शिंदे आणि फडणवीस एकत्र बसून निर्णय होईल. सामना हा टीका करण्यासाठी निर्माण केलेला कागदाचा तुकडा आहे. शिंदे – फडणवीसांना घेतलेले निर्णय याला मंत्रिमंडळ विस्तारानं वेग येईल. आमचं ठरलंय, असं होर्डिंग दिसते. मुंबई महापालिकेत आधी लगीन कोंढाण्याचं हे आमचं ठरलं, असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

Published on: Aug 15, 2022 07:49 PM
Eknath Shinde : खातं कोणतं त्यापेक्षा त्या खात्याला न्याय देणं महत्वाचे, खातेवाटपावरून स्पष्टीकरण
Governor Koshyari : 25 वर्षांनंतरचा अमृत काळ बघू शकणार नाही, राज्यपाल कोश्यारी यांचं वक्तव्य