इतर नेत्यांवर सरकार मेहरबान, पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मात्र मदत नाही, कोण करतंय गेम?
अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण या कारखान्याला थकहमी पोटी १४७.७९ कोटींची रक्कम.. तर अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काटे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांच्या कारखान्यांनाही आर्थिक मदत
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर आता राज्यसरकार मेहरबान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण या कारखान्याला थकहमी पोटी १४७.७९ कोटींची रक्कम देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काटे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांच्या कारखान्यांनाही आर्थिक मदत राज्य सरकारी बँकेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही. तर संग्राम थोपटे, अशोक बापू पवार यांच्या कारखान्यांनाही कोणतीच आर्थिक मदत जाहीर करण्यात आली नसल्याचे त्यांच्यात नाराजीचं वातावरण आहे. अशोक चव्हाण यांच्या कारखान्यासह सोलापूर येथील धनाजीराव साठे यांचा संत कुरूमदास सहकारी कारखाना पडसाळीचा कारखान्याला ५९.४९ कोटी मदत देण्यात आली आहे. कल्याणराव काळे यांचा भाळवणी पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याला १४६, ३२ कोटी रूपये मदत देण्यात आली बघा आणखी कोणत्या कारखान्यांना मदत मिळाली.