नाना पटोले यांचे 1 हजार व्हिडीओ ट्वीट करणार…; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा काय?
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा जुना व्हिडीओ भर सभेत लावला. ज्यात आदर्श सोसायटी घोटाळा आणि लीडर नाही तर डीलर असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावरील टीकेचा उल्लेख आहे
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधक जुन्या व्हिडीओवरून हल्लाबोल करताय. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा जुना व्हिडीओ भर सभेत लावला. ज्यात आदर्श सोसायटी घोटाळा आणि लीडर नाही तर डीलर असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावरील टीकेचा उल्लेख आहे. भाजप नेत्यांच्या या टीकेवरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टीकास्त्र सोडलं. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांनी लावलेला व्हिडीओ आणि ठाकरेंच्या टीकेवर उत्तर दिलंय. राजकारणात परिस्थिती बदलत असते असे महाजन म्हणाले. काँग्रेस सोडून अशोक चव्हाण भाजपात आल्याने ठाकरे गटाने भाजपने टीका केलेल्याचे व्हिडीओ समोर आणलेत. आता असे व्हिडीओ आपल्याकडेही असून नाना पटोलेंचा पहिला व्हिडीओ प्ले करण्याचा इशारा दिलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट