“संजय शिरसाट केव्हापासून भविष्यकार झाले?”, काँग्रेस फुटीच्या दाव्यावर अशोक चव्हाण संतापले!
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर काँग्रेस फूटीच्या बातम्या समोर येत आहे. त्यात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा केला आहे. यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 16 जुलै 2023 : शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर काँग्रेस फूटीच्या बातम्या समोर येत आहे. काँग्रेसचा मोठा गट हा लवकरच भाजपसोबत येणार असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, “पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेस फुटेल आणि भाजपसोबत सत्तेत येईल.” यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय शिरसाट केव्हापासून भविष्यकार झाले ? संजय शिरसाटाचं वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले.